नागपुरात विश्वशांतीचा जागर; भव्य 'ग्लोबल पीस धम्म रथयात्रा' उत्साहात संपन्न! | N7 News Voice
नागपुरात विश्वशांतीचा जागर; भव्य 'ग्लोबल पीस धम्म रथयात्रा' उत्साहात संपन्न!
नागपूर: "जगाला युद्धाची नाही, तर बुद्धाची गरज आहे," हा शांतता आणि करुणेचा वैश्विक संदेश देत नागपूरच्या पावन भूमीवर पहिली ऐतिहासिक 'ग्लोबल पीस धम्म रथयात्रा २०२६' अत्यंत उत्साहात पार पडली. उपराजधानीच्या रस्त्यांवरून निघालेल्या या भव्य जनसागराने आज विश्वशांतीचा हुंकार भरला.
भीम चौक ते दीक्षाभूमी: एक
ऐतिहासिक प्रवास
यात्रेची सुरुवात रविवारी दुपारी ४
वाजता इंदोरा येथील भीम चौक
येथून झाली. तथागत बुद्ध आणि डॉ.
बाबासाहेब आंबेडकरांच्या जयघोषाने संपूर्ण उत्तर नागपूर दुमदुमून गेले होते.
सजवलेला आकर्षक रथ आणि त्यामागे शिस्तबद्ध चालणारा हजारो अनुयायांचा समुदाय हे या
यात्रेचे वैशिष्ट्य ठरले.
मुख्य मार्ग आणि स्वागत:
ही यात्रा इंदोरा चौकातून कडबी चौक, गड्डीगोदाम आणि
संविधान चौकात पोहोचली. संविधान चौकात विविध सामाजिक संघटनांच्या वतीने रथावर
पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर व्हरायटी चौक,
झाशी राणी चौक, शंकर नगर आणि बजाज
नगर मार्गे जात ही यात्रा रात्री उशिरा
पवित्र दीक्षाभूमी येथे पोहोचली. येथे सामूहिक बुद्ध वंदनेने यात्रेचा समारोप झाला.
युद्धाच्या
छायेत 'बुद्धाची' शांती
आज जग जेव्हा रशिया-युक्रेन संघर्षासारख्या विनाशाच्या
उंबरठ्यावर उभे आहे, तेव्हा नागपूरच्या मातीतून निघालेली ही रथयात्रा केवळ एक
मिरवणूक नसून तो एक धोरणात्मक विचार ठरली आहे.
·
शस्त्राने
नव्हे, प्रेमाने विजय:
इतिहासाने सिद्ध केले आहे की शस्त्राने
मिळालेला विजय तात्पुरता असतो, पण बुद्धाचा धम्म मानवी मनावर कायमस्वरूपी विजय मिळवतो.
·
न
हेरवेन वेराणी: द्वेषाने द्वेष संपत नाही,
तो केवळ प्रेमानेच संपतो, हा धम्मपदातील शाश्वत
नियम आजच्या महासत्तांना नागपूरने पुन्हा एकदा आठवून दिला.
परिवर्तनाचा नवा अध्याय
केवळ उंच इमारती किंवा अण्वस्त्रे म्हणजे प्रगती नव्हे, तर एकमेकांप्रती
असलेला आदर आणि बंधुभाव म्हणजे खरी प्रगती,
हा संदेश या यात्रेने तरुण पिढीपर्यंत
पोहोचवला. नागपूरच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासात ही 'ग्लोबल पीस धम्म
रथयात्रा' एक मैलाचा दगड ठरली असून,
नागपूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित
राहून या शांतता अभियानात आपला सहभाग नोंदवला.
#GlobalPeaceDhammaRathYatra #NagpurNews #DhammaRally #WorldPeace #BuddhaMessage #Dikshabhoomi #NagpurUpdate #HumanityFirst #n7newsvoice
A Vigil for World Peace in Nagpur:
Grand 'Global Peace Dhamma Rathyatra' Concludes with Great Enthusiasm!
Nagpur: Delivering the universal message of peace and compassion—"The world needs Buddha, not war"—the first historic 'Global Peace Dhamma Rathyatra 2026' was celebrated with immense enthusiasm on the sacred soil of Nagpur. Traversing the streets of the sub-capital, this magnificent sea of humanity raised a resounding call for world peace today.
From Bhim Chowk to Deekshabhoomi: A
Historic Journey
The procession commenced on Sunday
at 4:00 PM from Bhim Chowk in Indora. The entirety of North Nagpur reverberated
with chants hailing Tathagata Buddha and Dr. Babasaheb Ambedkar. A beautifully
adorned chariot, followed by a disciplined multitude of thousands of devotees,
stood as the defining highlight of this procession.
The Route and Welcomes:
The procession proceeded from Indora
Chowk to Kadbi Chowk, Gaddigodam, and finally reached Samvidhan Chowk. At
Samvidhan Chowk, various social organizations showered the chariot with flowers
in a gesture of welcome. Subsequently, passing through Variety Chowk, Jhansi
Rani Chowk, Shankar Nagar, and Bajaj Nagar, the procession arrived late at
night at the holy Deekshabhoomi. The journey concluded here with a collective
'Buddha Vandana' (homage to the Buddha).
'Buddha's' Peace Amidst the Shadow
of War
At a time when the world stands on
the brink of destruction—overshadowed by conflicts such as the Russia-Ukraine
war—this procession, emerging from the very soil of Nagpur, represents not
merely a parade, but a profound philosophical statement.
• Victory
Through Love, Not Arms: History has proven that victory achieved through
weaponry is transient; however, Buddha's Dhamma secures a permanent victory over
the human mind. • Na hi verena
verani: "Hatred does not cease by hatred; it ceases only by love."
Nagpur once again reminded today's global superpowers of this eternal principle
from the *Dhammapada*.
A New Chapter of Transformation
True progress lies not merely in towering skyscrapers or nuclear arsenals, but in mutual respect and brotherhood towards one another—this is the message that this journey conveyed to the younger generation. The 'Global Peace Dhamma Rath Yatra' has emerged as a milestone in the social and cultural history of Nagpur, with the city's residents turning out in large numbers to actively participate in this peace campaign.
#GlobalPeaceDhammaRathYatra
#NagpurNews #DhammaRally #WorldPeace #BuddhaMessage #Dikshabhoomi #NagpurUpdate
#HumanityFirst #n7newsvoice


No comments